देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, ‘मूग गिळून बसता, तुमची मजबुरी तरी काय?’

  • Written By: Published:
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, ‘मूग गिळून बसता, तुमची मजबुरी तरी काय?’

मुंबई : सध्या कॉंग्रेसचे रायपूर येथे ८५ वे अधिवेशन (85th Session of Congress at Raipur) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बोलतांना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांची (Savarkar) बदनामी करणारे वक्तव्य केले आहे. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही काँग्रेससोबत सत्तेत होते. तेव्हा तुमची मजबुरी होती. मात्र आताही तुम्ही शांत का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

https://www.youtube.com/watch?v=7iDNg6drHRA

जो आपल्यापेक्षा बलवान आहे त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे ही सावरकरांची विचारसरणी आहे. भाजप हीच विचारधारा पुढे घेऊन जात आहे, अशी टीका राहुल गांधीनी केली. यावर बोलतांना फडणसीस म्हणाले की, मला एक गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतीदिन आहे. मात्र, आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

Ajit Pawar यांची निवडणूक आयोगावर टीका… तर राजू पाटील यांना अख्खा ‘मनसे’ पक्ष देणार का?

उद्धवजी, मागील काळात तुमची मजबुरी होती. तुम्ही राहुल गांधींना विरोध केला नाही. कारण, तुम्हाला सरकार चालवायचं होतं. त्यामुळे रोज राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचे. तरी तुम्ही मूग गिळून गप्प बसत होते. आता तुमची नेमकी मजबुरी काय आहे?, असा खोचक सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. आजही तुम्ही ज्यांच्या गळाभेटी घेता ते रोज स्वातंत्र्यवीरांचा अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या अधिवेशनात चार आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. तीन ते चार वर्षांनी आता चार आठवड्यांचं अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सामान्य माणसाच्या हिताकरिता चर्चा व्हावी आणि निर्णय घेण्यात यावे. तसेच सरकार यासाठी सज्ज आहेत. लोकहिताचे निर्णय या अधिवेशनात राज्य सरकारकडून घेतले जातील. विधानपरिषदेत आता ३ बिलं ही प्रलंबित आहेत. तसेच ७ अजून प्रस्तावित विधयकं आहेत. यामध्ये जे लोकायुक्ताचं बिल आहे, ते या अधिवेशनात करण्यासंदर्भात आमचा निर्णय असेल, तसेच विरोधकांनी लोकायुक्तसारखा कायदा मंजूर करण्यासाठी मदत करावी. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.

८ मार्चला आपण आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार आहोत. तर ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. आज चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकतांना नेहमीचीच कारणं दिली आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पावरील त्यांची प्रतिक्रिया देखील तयार झाली असेल. त्यांनी आमचा अर्थसंकल्प वाचावा अशी आमची अपेक्षा आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube