राज ठाकरे यांच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा का झाली? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला तो किस्सा…

राज ठाकरे यांच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा का झाली? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला तो किस्सा…

मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे अतिशय शांत स्वभावाचे होते. आवश्यक असेल तेव्हाच तुफानापेक्षा जास्त संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे अखंड महासागर होते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांदीआळीतले वेगळे असे नेते होते. बाळासाहेबांचे तैनचित्र सभागृहात लागले आहे. परंतु, सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीचं नव्हता. त्यांनी विचार केला असता, तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले आहेत. सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगितला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना जेव्हा सोडली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सामनात एक कार्टून काढला होता. ते कार्टून त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांचं होतं. त्यावेळी आर. आर. पाटील (RR Patil) यांनी एक हक्कभंग आणला होता. समितीने असा निर्णय घेतला की, प्रबंध संपादक यांना बोलविण्यात आले होते, त्यानिमित्त समितीसमोर बाळासाहेब यांनी उपस्थित राहण्याचा आदेश काढला होता. पत्रकार, व्यंगचित्रकार होते. बाळासाहेब हे तत्वानी चालणारे महान व्यक्ती होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुढाकार करावा की, लोकशाहीने मूल्य दिले. सभागृहाच्या समितीच्या समोर जावं, असा प्रश्न पडला. त्यावेळी ते स्वतः हक्कभंग समितीच्या समोर बाळासाहेब गेले होते. तिथं विनोदबुद्धी चालू राहायची. बाळासाहेबांचा आदर होता. कोणीतरी गोड ठेवलं. तेव्हा त्यांना विचारलं गोड खाता का…? तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी पैसे सोडून सगळं खातो. समितीनं बाळासाहेब यांना शिक्षा सुनावली होती.

परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव ठेवला होता. यानंतर सभागृहाने देखील ती शिक्षा मागे घेतली, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी  यावेळी सांगितला आहे. व्यक्तीला त्यांना ओळखता येत होते. दिलदारपणा असतो, तेव्हा व्यक्ती मोठा होत असतो. मोठे होण्याकरिता मनाचा दिलदारपणा देखील मोठा लागतो. समाजात सर्व स्तरात  बाळासाहेबांविषयी आपुलकी आहे. कारण त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना संधी देत असतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube