Congress मधील वाद विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता, त्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. ही कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले (Nana Patole)यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांची तक्रार थेट पक्षाच्या हायकमांडकडे केली होती. त्यातच आता त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आता एका पाठोपाठ राजकीय घडामोडी घडत आहेत.
पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाला गेलाय. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
हेही वाचा : Vikhe Vs Thorat : बाळासाहेब एक काय ते सांगा.., मंत्री राधाकृष्ण विखेंचा टोला
थोरात यांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मौन सोडलंय, ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देत असून राजकीय उत्कर्ष व्हावा, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आम्ही आज कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीत यश मिळवलेल्या आमदारांचा सत्कार आयोजित केला आहे. 15 तारखेला बैठक ठेवली आहे, असेही यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय.