दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, फडणवीसांची घोषणा

WhatsApp Image 2022 12 22 At 2.37.26 PM

मुंबई : दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहातील गदारोळानंतर ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही आता ही चौकशी होणार असल्याने सत्ताधारी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.

फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियान केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे होती. नवीन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, दिशा सालियन जिवंत नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचं असले तर पूजा चव्हाणची देखील चौकशी करायची आहे. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका.

खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर आज विधानसभेत याचे पडसाद उमटले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणेंनी केली होती. त्यावरून सभागृहात जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले आहेत.

Tags

follow us