‘भाजपकडून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

‘भाजपकडून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २०२३- २४ चा अर्थसंकल्प मांडला. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह (Maharashtra) मुंबईसाठी तरतूद केली नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) घणाघात केला आहे.

अदानी समूहात झालेल्या घोटाळ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर (government) जोरदार हल्ला चढवला. अदानी समूहाने केलेला घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा, असा घोटाळा झाला नाही. त्यात सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. अदानीच्या सिंगापूर आणि मॉरिशमध्ये शेल कंपन्या आहेत. हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे. यावर भाजपच्या नेत्यांनी आवाज का उठवला नाही ? तपास यंत्रणा का बोलत नाही ? केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठीच तपास यंत्रणा आहेत का ? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.

अदानी समूहाने (Adani Group) केलेल्या घोटाळ्यावर आम्ही संसदेत आवाज उठवणार, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आता बैठक होणार असल्याचे त्यांनी यावेळी केली. या बैठकीत आम्ही आमची रणनीती ठरवणार आहोत. पुढे काय करायचं देखील ठरवणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थ संकल्पावरही संजय राऊत यांनी टीका केली. अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राला नक्की काय मिळालं ? अर्थ खात्याच्या साऊथ ब्लॉकला जो हलवा तयार करतात तो चमचाभर हलवाही मुंबईच्या हातावर मिळाला नाही. मागील काही वर्षापासून औद्योगिकदृष्ट्या मुंबई आणि महाराष्ट्राचं अध:पतन करण्याचं काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत येत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येत आहेत. फडणवीस केवळ घोषणा करत आहेत. केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होत आहेत. आणि त्यामुळ मोदी मुंबईत येत आहेत. पण येताना मुंबईसाठी काय देतात हा विषय महत्वाचा आहे. पंतप्रधान मुंबईत येत आहेत, त्यांचं स्वागत करतो. पण येताना मुंबईसाठी काही घेऊन या. रिकाम्या हाताने येता आणि झोळी घेऊन जात असल्याने हे दुर्देव आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube