Patel – Fadanvis : काल ED कारवाई, आज कौतुक; राष्ट्रवादी-भाजप ‘चुंबाचुंबी’

  • Written By: Published:
Patel – Fadanvis : काल ED कारवाई, आज कौतुक; राष्ट्रवादी-भाजप ‘चुंबाचुंबी’

गोंदिया : काल शरद पवारांच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर आज प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आज एकाच मंचावर पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. त्याच दरम्यान दोन्हीही नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेली राजकीय फटकेबाजी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल यांना आश्वासित केले व सूचक इशारा देत जेव्हा गरज पडेल आम्ही तुमची साथ देऊ, असे वक्तव्य केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल (Manoharbhai Patel) यांच्या जयंतीनिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित असतांना प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार असल्याने काय बोलणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

याच दरम्यान आपल्या भाषणात बोलत असतांना प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर स्तुतीसुमणं उधळली आहे. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मित्र प्रफुल्ल पटेल यांच्या निमंत्रणावरुन येथे आलो. स्वातंत्र्यानंतर समाजात योगदान देणाऱ्यांमध्ये भंडारा – गोंदियात जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांचं नाव येतं. शिक्षण क्षेत्रात मनोहर भाई पटेल यांचं मोठं काम आहे. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांच्या नेतृत्त्वात इथल्या शिक्षण संस्था सध्या चालत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नवीन शिक्षण धोरणं घेऊन देशाचा विकास करतायत.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, मी आणि प्रफुल्ल पटेल एकत्र आलो त्यामुळे चर्चा तर होणारच, बात निकली तो दुर तक जाएगी. त्याची चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की, राजकारणात विचारांचे विरोधी असतो व्यक्तीचे नसतो. निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात उभे राहू पण नंतर सोबत चहाही घेवू शकतो. एकाच मंचावर येऊ शकतो. जोपर्यंत ही संस्कृती आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपल्या विकासाला कुणी रोखू शकत नाही. प्रफुल पटेलांचे कार्य उत्तम आहे. त्यामुळे ते जे काम करतात, ते चांगले आहे. आमची जेव्हाही गरज पडेल आम्ही तुमच्या सोबत राहू असा सूचक इशाराही यावेळी फडणवीसांनी पटेलांना दिला.

‘…शिवसैनिकांचा हिसका दाखवला जाईल ; शरद कोळींचा इशारा  

तर प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सारखा हुशार नेता नाही असे म्हणत कौतुक केले आहे. प्रफुल्ल पटेल हे खरंतर शरद पवार यांचे राइटहँड म्हणून ओळखले जातात. त्यात पटेल यांनी आज फडणवीस यांना निमंत्रित केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर ज्या पद्धतीने कौतुकांचा वर्षाव केला आहे. ते पाहता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. इतकंच काय आगामी काळात प्रफुल्ल पटेल भाजपात प्रवेश करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, इथवर अंदाज बांधले जात आहेत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube