Mandakini Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Mandakini Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना जामीन मंजूर मिळाला आहे. कारण, विशेष पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) त्यांना २०१६ च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती दिली. न्यायालायने मंदाकिनी खडेस यांना विनापरवानगी देश सोडू नये, असे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे. आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण- फडणवीस सरकारच्या कालावधीत महसूल मंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमिनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्याकरिता पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला होता. या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी होती, ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ साली तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी या प्रकरणाविषयी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसान भरपाई द्यावी, याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला आहे. या बैठकीनंतर अवघ्या पंधरवड्यातच उकानी यांनी खडसेंच्या नातेवाईकांना म्हणजेच पत्नी आणि जावयाला भूखंड विकला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube