Eknath Shinde यांचा ठाकरेंवर हल्लाबोल : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला!
Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा त्याग, बलिदान विसरून त्यांचा अपमान केला जात आहे. सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे हे बसले आहेत. तुम्ही एक दिवस तरी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहु शकता काय, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना विचारला आहे.
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने ठाणे शहरात ‘वीर सावरकर गौरव’ यात्रा काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले. तेव्हा हिंदूंचा मान-सन्मान वाढला आहे. परंतु, प्रखर हिंदुत्ववादी, प्रखर देशभक्त असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रखर हिंदुत्ववादी विचार रोखण्याचे काम या देशातील काही लोकं करत आहेत. या देशात सर्व जाती-धर्म गुण्यागोविंदाने राहत आहेत. म्हणून काही लोकं सावरकर यांचा वारंवार अपमान करण्याचे काम करत आहेत. या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपण सावरकर गौरव यात्रा काढली आहे.
‘सरकार नपुंसक.. कोणीही या काहीही बोला’; बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा संताप – Letsupp
ज्यावेळी लोकं हिंदू म्हणून नाव घ्यायला हिम्मत करत नव्हते. तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा दिला. काँग्रेसचा मंत्री मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा सावरकर यांचा अपमान केला. तेव्हा रस्त्यावर उतरून बाळासाहेब ठाकरे यांनी त्या अय्यरच्या प्रतिमेला जोडा हाणण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. तर आता काँग्रेसचे राहुल गांधी हे वारंवार अपमान करत आहेत. मात्र, या देशातील हिंदू आता जागृत झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना धडा शिकवल्याशिवाय तो आता स्वस्त बसणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावले.
(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube