आशुतोष काळेंना एक नंबरच्या मताधिक्यांनी निवडून द्या, भाजपा नगरसेवक सत्येन मुंदडा यांचं आवाहन

  • Written By: Published:
आशुतोष काळेंना एक नंबरच्या मताधिक्यांनी निवडून द्या, भाजपा नगरसेवक सत्येन मुंदडा यांचं आवाहन

Ashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपचे प्राबल्य आहे. (Ashutosh Kale) दोन्ही पक्ष महायुतीत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात असून, महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवण्याची संधीही कोपरगावकरांना चालून आलेली आहे असं प्रतिपादन भाजप नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी केलं. ते प्रचार सभेत बोलत होते.

आशुतोष काळे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भरपूर विकास कामं केली आहेत. विकास कामाबरोबरच सर्व जनतेशी संपर्कात राहिले, सर्व समाजाच्या, सर्व जाती-धर्माच्या, सर्व स्तरातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाले. गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस धावून आले. कोरोना असो अथवा महापूर असो काळे-कोल्हे यांची यंत्रणा सर्वात पहिले मदतीला असते असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

आशुतोष काळेंना भरघोस मतदानातून देणार कामाची पावती, लाडक्या बहिणींचा निर्धार…

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करून कोपरगावची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. व्यापारी असोसिएशन व गोदाकाठ, एक्सपोच्या माध्यमातून कोपरगावच्या बाजारपेठ वृद्धी साठी सातत्याने प्रयत्न केले आहेत असंही ते म्हणाले आहेत.

आमदार असूनही अतिशय नम्रपणे, कोणताही बडेजाव न बाळगता जनतेशी संपर्कात राहिले. त्यांच्या या कामाची पावती म्हणून सर्व कोपरगावकरांनी एकजूट दाखवून येत्या २० तारखेला आशुतोष काळे यांना महाराष्ट्रात नंबर एकच्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहनही सत्येन मुंदडा यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube