आशुतोष काळेंनी जिरायती भागाला न्याय दिला, आम्हीही आ. काळेंना 20 तारखेला न्याय देणार

  • Written By: Published:
आशुतोष काळेंनी जिरायती भागाला न्याय दिला, आम्हीही आ. काळेंना 20 तारखेला न्याय देणार

कोळपेवाडी : मतदारसंघात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जिरायती भागातील विविध गावांमध्ये पिण्याच्या व शेती सिंचनाचा प्रश्न अतिशय बिकट झालेला होता. मतदारसंघातील या जिरायती गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावे लागत असे. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. कारण आ. आशुतोष काळेंनी (Ashutosh Kale) आमच्या जिरायती भागाला न्याय दिलाय, त्यामुळे आमच्या जिरायती गावातील सर्व सुज्ञ मतदार वीस तारखेला आ.आशुतोष काळेंना न्याय देणार असल्याचे रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते (Gajanan Mate) यांनी सांगितले.

आशुतोष काळेंचे काम एक नंबर, घड्याळाचे बटन एक नंबर आणि त्यांना मताधिक्य देखील एक नंबर द्या : सुनील गंगुले 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पोहेगाव गटातील रांजणगाव देशमुख येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिरायती गावाला आ. आशुतोष काळे यांनी पिण्याच्या आणि सिंचनाच्या बाबतीत समृद्ध केल्याचे सांगत आमची जिरायती ओळख पुसली आहे. त्याबद्ल जिरायती गावातील नागरिकांच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी, अंजनापूर तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

आशुतोष काळेंना भरघोस मतदानातून देणार कामाची पावती, लाडक्या बहिणींचा निर्धार… 

मागील सलग तीन वर्षापासून नगर जिल्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून निळवंडे कालव्याच्या पाण्यातून पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव भरून घेतल्यामुळे दुष्काळाच्या झळा कमी जाणवल्या. उन्हाळ्यात देखील पाणी टंचाई जाणवली नाही आणि पशु धनाचा चाऱ्याचा प्रश्न सुद्धा भेडसावला नाही. आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून या जिरायती गावातील सर्वच बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव, ओढे ओव्हर फ्लोच्या पाण्यातून तुडूंब भरण्यात आले. काही गावांसाठी वरदान ठरलेली उजनी उपसा जलसिंचन योजना त्यांनी चालविली. अशा विविध माध्यमातून पाण्याच्या उपलब्धतेमुळे या पाच वर्षात जिरायती भागातील गावांची परिस्थिती बदलली असून सर्व जिरायती गावात जलक्रांती आ.आशुतोष काळे यांच्यामुळे झाली. आमच्या जिरायती गावासाठी ते जलदूत ठरलेत, हे जिरायती गावातील नागरिक कधीही विसरणार नाहीत.

गोदावरी व प्रवरा नदीच्या पाण्याचा संगम घडवून आणतांना ज्या गावात ज्या पद्धतीने पाणी नेता येईल, त्या पद्धतीने त्यांनी पाणी पोहोचविले. प्रवरेचे पाणी जिरायती भागातून पोहेगाव शिवारापर्यंत येणे अशक्यप्राय गोष्ट होती, मात्र ती अशक्यप्राय गोष्ट देखील आशुतोष काळेंनी आपल्या प्रयत्नातून शक्य करून दाखवले. ज्या ठिकाणी नैसर्गिक रित्या पाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी चाऱ्यांची कामे देखील सुरु झालेली आहेत. त्यामुळे आमच्यासाठी वेळप्रसंगी कालव्यांवर बैठक ठोकून आम्हाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या व आमच्यासाठी जलदूत ठरलेल्या आ.आशुतोष काळे यांनी आम्हाला न्याय दिला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना बुधवार (दि.२०) रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानातून भरघोस मतदान करून न्याय देणार असल्याचे रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते यांनी यावेळी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube