माजी मंत्री शिवतारे चुकले; अहमदनगरबाबत दिली चुकीची माहिती

माजी मंत्री शिवतारे चुकले; अहमदनगरबाबत दिली चुकीची माहिती

नगर : अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ आहेत. अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे या मतदार संघांची नावे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाचे नाव बदलावे. असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. मात्र त्यांनी यावेळी टीकेच्या ओघात त्यांनी आपले मत मांडताना अहमदनगर जिल्ह्याबाबत चुकीची माहिती दिली. त्यामुळे मंत्री शिवतारे नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिंदे गटाचे नेते मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. बारामती लोकसभा मतदार संघाचे नाव बदलावे, बारामतीही पवारांची नसून पवार बारामतीत राहतात. जिल्ह्यातील भागाच्या नावावरून लोकसभा मतदार संघाची नावे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा मतदार संघाला बारामती हे नाव देणे चुकीचे आहे, असे ठामपणे सांगत असताना शिवतारे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ आहेत. अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे या मतदार संघांची नावे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाचे नाव बदलावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र बोलण्याच्या ओघात त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांतील नावे त्यांनी चुकीची सांगितली.

लोकसभा मतदार संघांची नावे त्या मतदार संघातील लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या विधानसभा मतदार संघावरून ठेवली जातात. जिल्ह्यातील भागावरून ठेवली जात नाहीत. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यातील अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील तर शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. तरीही त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे मंत्री शिवतारे यांचे भाषण नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube