“…तर शरदचा शमशुद्दीन, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन झाला असता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
सोलापूर : जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी वादग्रस्त विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार (Ajit Pawar) हे अझरोद्दीन, शरद पवार (Sharad Pawar) हे शामशोद्दीन आणि रोहित पवार हे रझाक झालें असते.’ अशी जोरदार टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये करणे आणि घाण राजकारण करणे ही पवारांची ५० वर्षांपासूनची कूटनीती आहे. केवळ मतांसाठी खालच्या पातळीचे राजकारण पवारांनी कसे केले हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. हिंदू लोकांनी हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, यावर राज्यातील जनताच त्यांना योग्य उत्तर देणार असल्याचा टोला पडळकरांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आव्हाड म्हणाले होते की, मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता. यावर भाजप आक्रमक भूमिका घेत आहे. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर पडळकर परत एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, असे म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असल्याचा टोला आमदार पडळकर यांनी लगावला.