मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

  • Written By: Published:
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

 Harshvardhan Sapkal  : काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्राची कमान हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ नाना पटोले यांची जागा घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसची कमान कोणाकडे देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नुकतंच नाना पटोले यांनी दिल्ली दौऱ्यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुढील आठवड्यात काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेस हायकमांडकडून हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यासह सतेज बंटी पाटील (Satej Bunty Patil) , अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांच्या नावाचा विचार देखील करण्यात येत होता.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अमित देशमुख काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी  काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 16 जागांवर विजय मिळवता आल्या होत्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीमाना देण्याची तयारी केली होती.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते असून ते गांधी घराण्याशी जवळीचे आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सध्या ते राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube