‘कितीही बदनाम करा फरक पडणार नाही’…सहर शेखची ‘औरंगजेबा’च्या समर्थनात पोस्ट, नव्या वादाला तोंड?

एमआयएमच नगरसेवक सहर शेखने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत औरंगजेबाजाचे कौतूक करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sahar Shaikh

Sahar Shaikh Aurangjeb Post : ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेली एमआयएमची नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सहर शेखने एक पोस्ट शेअर करीत औरंगजेबाचे कौतूक करीत औरंगजेबाची कितीही बदनामी करा, फरक पडत नाही, इतिहास कसा पुसता येईल, असं म्हणत चक्क औरंगजेबाची स्तुती केलीयं. या पोस्टमुळे सहर शेख सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत असून सहर शेखच्या या पोस्टने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सहर शेख पोस्टमध्ये म्हणाली, वादग्रस्त असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक असा सम्राट ज्याने पूर्ण श्रद्धेने, शक्तीने मलिक उल हिंदवर राज्य केलं. पण लक्षात ठेवा इतिहास कधीही पुसता येत नाही, असं सहर शेखने म्हटलंय. तसेच एक फोटोही शेअर करीत फोटोत सिंह आणि औरंगजेब यांचा फोटो एकत्र करीत औरंगजेबाचं महत्व पुसणारे कितीही चित्रपट तयार करा, काहीही बदनामी करा, काहीच फरक पडत नसल्याचही तिने म्हटलंय.

यासोबत हुमायूनच्या कबरीच्या बाहेर उभे असतानाचा फोटो सहर शेखने पोस्ट करत काही सवाल केले आहेत. माझ्यामागे हुमायुनची कबर आहे. कधी विचार केला का? की कबर अशी बांधत असतील, तर देश कसा कसा चालवत असतील.? त्याचप्रमाणे मुघल काळातल्या इतरही अनेक पोस्ट सहर शेखने केल्या आहेत.

मुघलांनी ताजमहाल बांधला आणि जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. आणखी एक फोटो पोस्ट करत म्हटलंय गंमत काय माहीत आहे का? त्यांना इतिहासातून मुघलांना बाहेर काढायचं आहे. पुस्तकांतून मुघलांना बाहेर काढू शकतात पण या जमिनीवरून कसं बाहेर काढाल? असा प्रश्न सहार शेखने उपस्थित केला आहे. इनशाँ अल्लाह मुघलिया सल्तनत का इकबाल हमेशा बुलंद रहे असंही सहार शेखने म्हटलं आहे. ज्यावरून वाद सुरू झाला आहे.

दरम्यान, सहर शेखने नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर मुंब्रातील जाहीर सभेतून ‘कैसा हराया’ म्हणत विरोधकांना डिवचलं होतं. त्यावेळी सहर शेखने केलेल्या भाषणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. विरोधकांनीही तिच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा सहरने केलेल्या पोस्टमुळे ती विरोधकांच्या टीकेची धनी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

follow us