‘कैसा हराया’वरुन रान पेटलं! भाजप आमदार पोलिस ठाण्यात, सहर शेख यांना नोटीस…

कैसा हराया म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांनी नोटीस बजावली असून भडकाऊ भाषण करु नये, असं नोटीशीत म्हटलंय.

Untitle (10)

Sahar Shaikh : मुंबईतील एमआएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख (Sahar Shaikh) यांना मुंब्रा पोलिसांनी नोटीस बजावलीयं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आयोजित सभेत कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होतं. त्यांच्या या भाषणावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर सहर शेख यांना नोटीस बजावण्यात आलीयं.

महापौरपदाची सोडत काढणाऱ्या मिसाळांच्या नातेवाईकांचे नाव पुण्यासाठी चर्चेत वाचा संभाव्य यादी…

मुंब्र्याला हिरवं करायचं, या आशयाचं विधान सहर शेख यांनी भर सभेत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वक्तव्याची दखल आम्ही घेतली आहे. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करु नका म्हणून बजावलं आहे. तसंच नोटीस बजावली आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिस बंदोबस्तात पैसे वाटतो…निवडणुकीत आमदार नारायण कुचेंकडून पैसेवाटप? कथित रेकॉर्डिंग व्हायरल..

दरम्यान, मुंब्रा नाव घेतलं की, पहिला चेहरा समोर येतो तो म्हणजे शरद पवार गटाचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांचा. पण, याच आक्रमक आमदार असणाऱ्या आव्हाडांच्या पायाखलची जमीन नुकत्याच जाहीर झालेल्या पालिका निवडणुकांच्या निकालानंतर सरकल्याची चर्चा आहे. कारण, आव्हाडांचा गड मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यामध्ये MIM चे चारही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडणून आले आहेत. या विजयानंतर आव्हाडांचे कट्टर विरोधक असणाऱ्या युनूस शेख यांची मुलगी सहार शेखने तुतारी को कैसे हराया? असे म्हणत आव्हाडांना डंख मारला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

follow us