‘धरणवीर’ ला ‘धर्मवीर’ कसे समजणार, राणेंची अजित पवारांवर टीका

Untitled Design (14)

मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर नको, स्वराज्यरक्षक म्हणा असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांच्याविरुद्ध आंदोलनही करण्यात आले होते. आता याच मुद्द्यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांना डिवचले आहे.

नेमकं काय म्हणाले राणे? जाणून घ्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाचा समाचार नितेश राणे यांनी ट्विटरवरून घेतला आहे. ते म्हणाले की, “धरणवीर” ला “धर्मवीर” कसे समजणार .. आता धर्म रक्षणासाठी .. तलवार नको “शाही पेन” ही चालेल.. हर हर महादेव !!! असे ते यावेळी म्हणाले आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube