‘मला शिंदे-पवारांसोबतची भाजपा आवडत नाही’; असं का म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
Sudhir Mungantiwar : मला शिंदे-पवारांसोबतची भाजपा आवडत नसल्याचं मोठं विधान राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत आधी एकनाथ शिंदेंनी बंड करीत भाजपचा हात धरला, शिंदेंपाठोपाठ अजित पवारांनीही महाविकास आघाडीला रामराम केल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन मुनगंटीवारांना तुम्हाला शिंदेसोबतची भाजप की पवारांसोबतची भाजप आवडते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यांच्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला शिंदेंसोबतची भाजपा आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडत असल्याचं मुनगंटीवारांनी उत्तर दिलं आहे. नूकतंच एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना तुमच्या मनातला भावी मुख्यमंत्री कोण? असा सवाल करण्यात आला होता.
Baaplyok Movie: ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम पोहोचली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी
त्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच सुरात भन्नाट उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस पाठोपाठ अजित पवारांनीही एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने आता मी कोय बोलणार? असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन केलं होतं. आता सुधीर मुनगंटीवारांनीही आपल्याला कोणासोबतची भाजपा आवडते त्यावर आफलातून उत्तर दिल्याने त्यांच्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
Shekhar Kapoor : चित्रपटसृष्टीतील फिल्ममेकिंग आयकॉन डायरेक्टरची अनोखी कहाणी
2019 साली शिवसेनेशी युती तुटल्यानंतर राज्यात भाजपला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. मागील वर्षीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला समर्थन दिलं होतं.
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. आणि भाजप-शिंदे गटाचं सरकार राज्यात स्थापन झालं. या बंडाच्या एक वर्षांनंतर अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची स्टाईल मारत आपल्या समर्थकांसह भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला.