भारताचा हिंदु पाकिस्तान करायचाय, आव्हाडांचं साध्वी प्रज्ञा सिंहवर टीकास्त्र

भारताचा हिंदु पाकिस्तान करायचाय, आव्हाडांचं साध्वी प्रज्ञा सिंहवर टीकास्त्र

मुंबई : ‘खासदार व मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने आपल्या घरामध्ये धारधार शस्त्र, चाकू ठेवा जेणेकरून आपल्याला कधीही ते वापरता आले पाहिजे असे विधान केले आहे. खरंतर तीच्यासारखे सगळ्यांनी बॉम्ब स्फोटाचेही प्रशिक्षण घ्यायला हवं. ते ठेवण्याचेही प्रशिक्षण घ्यायला हवं. घरात फक्त चाकू नाही तर RDX,मशीनगन, स्टेनगन, एके 47, रिव्हालवर सगळच ठेवा. कारण आता आपल्याला हिंदुस्थान म्हणजेच भारताचा हिंदु पाकिस्तान करायचा आहे. जे पाकिस्तानचं झालं ते भारताच करायचं आहे.’ असं ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साध्वी प्रज्ञासिंगवर टीका केली आहे.

‘लव्ह जिहाद करणाऱ्यांना तसेच उत्तर द्या. तुमच्या मुलींना सुरक्षित, सुसंस्कृत ठेवा. घरी शस्त्र नसेल तर भाजी कापण्यासाठीचा चाकू तरी धारदार ठेवा.
असे वक्तव्य भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. त्या रविवारी कर्नाटकमधील शिवमोगाच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा लव्ह जिहादवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

कर्नाटक येथील शिवमोग्गा इथल्या हर्षासह हिंदू या कार्यकर्त्याची हत्या झाली. या हत्येबद्दल ‘हिंदू जागरण वेदिके’च्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील विधान केले. त्याचबरोबर भाजप प्रज्ञा ठाकूर यांनी पालकांना आपल्या मुलांना मिशनरी संस्थांमध्ये न पाठवण्याचा सल्ला दिला. ‘असे केल्याने तुम्ही फक्त तुमच्यासाठी वृद्धाश्रम उघडाल.’ असंही त्यांनी म्हटलं. ‘मिशनरी संस्थांमध्ये मुलांना शिकवून मुले तुमची आणि तुमच्या संस्कृतीची होणार नाहीत. ते वृद्धाश्रम संस्कृतीत वाढतील आणि स्वार्थी होतील.’ असं त्या पुढे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube