Jayant Patil : कुत्र्याचे लसीकरण देखील यांनी सोडले नाही

  • Written By: Published:
Jayant Patil : कुत्र्याचे लसीकरण देखील यांनी सोडले नाही

पुणे : कसाब आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत. आज नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने प्रचार सभा घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप वरती तोफ डागली ते म्हणाले यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत किती भ्रष्टाचार झाला किती प्रकरण समोर आली हे सर्वानी माहित आहे. यांना कुत्र्याच्या लसी देखील पुरल्या नाहीत त्यांनी त्यात देखील भ्रष्टाचार केला.

भाजपवर टीका करत जयंत पाटील पुढे म्हणाले यांनी सरकार पाडण्यासाठी लक्ष्मणराव जगताप यांना वाईट परिस्थितीत देखील विधानपरिषदेच्या मतदानासाठी नेले. निवडणुकीशिवाय भाजपला काहीही दिसत नाही, निवडणुकीचे यंत्र म्हणजे भाजप असं देखील पाटील म्हणाले

पुढे व्हिडिओ दाखवून जयंत पाटलांची भाजप वरती टीका केली महाराष्ट्रात आपण काहीही विकत घेऊ शकतो ही भाजपची भावना झाली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी खोके देऊन आमदार विकत घेतले.

महागाईवर बोलताना पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले या देशातील नेतृत्वाने चुकीची धोरण स्वीकारली, त्यामुळे या देशात त प्रचंड महागाई वाढली.

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले अजित पवार यांच्यामुळेच पिंपरी चिंचवड एका नियोजित शहर होऊ शकलं आज पिंपरी चिंचवड जे काही आहे ते फक्त अजित दादामुळेच तसेच दादांनी अर्थमंत्री असताना त्यांनी आपलं राज्य आर्थिक अडचणीत येऊ दिलं नाही.

Chinwad Bypoll : शिवाजीमहाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादीला धडा शिकवा! 

शेवटी जयंत पाटील यांनी राज्यपालांवरती देखील टीका केली आम्ही ची नाव सुचवली त्या लोकांना आमदार करण्यासाठी राज्यपालांनी नकार दिला. या राज्यपालाने आपल्या आराध्य दैवताचा अपमान केला आणि अशा राज्यपालना भाजपने जवळ केले. तसेच कोसरींनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वर देखील टीका केली. पदोपती राज्यपालांनी महाराष्ट्रातील युगपुरुषाचा अपमान केला परंतु भारतीय जनता पार्टीने कधीही त्याचा निषेध केला नाही

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube