Jayant Patil यांच्या मुलाची राजकारणात अधिकृत एन्ट्री; ‘या’ पदावर नेमणूक

  • Written By: Published:
Jayant Patil यांच्या मुलाची राजकारणात अधिकृत एन्ट्री; ‘या’ पदावर नेमणूक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांच्याशी त्यांचा विवाह पार पडला होता. मागील काही दिवसापासून प्रतीक पाटील यांच्या राजकीय प्रवेशाची तयारी चालू होती.

जयंत पाटील यांच्या राजकारणाची सुरुवातही कारखान्यातूनच

महत्वाची बाब म्हणजे जयंत पाटील यांच्या राजकारणाची सुरुवातही कारखान्याच्या राजकारणातून झाली आहे. जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू यांचे निधन झाल्यानंतर त्यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. तिथून जयंत पाटील यांच्या राजकारणाला सुरुवात झाली होती. प्रतीक पाटील यांनीही वडीलाप्रमाणे साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात सुरुवात केली आहे.

प्रतीक पाटील मागच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर वाळवा इस्लामपूर मतदारसंघात कामं करण्यासही सुरूवात केली आहे. पण आज कारखान्याच्या संचालकपदी त्यांचा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube