धाराशिव बाजार समितीतल्या पराभवाचा वचपा झेडपीच्या निवडणुकीत काढणार; ठाकरे गटाच्या आमदाराचा इशारा

धाराशिव बाजार समितीतल्या पराभवाचा वचपा झेडपीच्या निवडणुकीत काढणार; ठाकरे गटाच्या आमदाराचा इशारा

Kailas Patil : Our last defeat in Dharashiv will make up for it : काही दिवसांपूर्वीच राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले. या बाजार समित्यांच्या निवडणुकांत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharashiv Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती (BJP-Shiv Sena grand alliance) व महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) पूर्ण ताकत पणाला लावली. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar, आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) आणि भाजपचे आमदार राणाजगजित सिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil यांच्याकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

यात अखेर भाजप आमदार राणाजगजित सिंह पाटील यांच्या नेतृत्वातील भाजप – शिवसेना शेतकरी विकास पॅनलने महाविकास आघाडीला धुळ चारली. यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बाजार समितीतील पराभवाचा वचपा पंचायत समितीच्या निडवणुकीत काढणार असल्याचा दावा केला आहे.

भाजपचे आमदार राणाजगजित सिंह पाटील व शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का दिला. व्यापारी मतदार संघातून महाविकास आघाडीची केवळ एक जागा निवडून आली. हा पराभव आमदार कैलास पाटलांच्या चांगलचा जिव्हारी लागला आहे.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी बारसूत काहीतरी घडणार; निलेश राणेंनी व्यक्त केली वेगळीच भीती

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपचीच सत्ता होती. ही सत्ता काबीज करण्यासाठी मविआनं मागील काही दिवसांपासून कंबर कसली होती. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लागली होती. मतमोजणी पूर्वीपर्यंत आघाडी आणि युती यांच्याकडून विजयाचा दावा करण्यात येत होता. पण, यात युतीनं बाजी मारली.

ठाकरे गटाचे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धाराशिव बाजार समितीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर भाष्य करतांनाच भाजप-शिवसेना युतीला जाहीर इशारा दिला. धाराशिव बाजार समितीच्या निवडणुकीत आम्हाला 3 पैकी 2 बुथवर चांगली मत पडली. फक्त एका बुथवर आम्ही मागे पडलो. याचं आम्ही नक्की आत्मपरिक्षण करणार आहोत. पण धाराशिवचा पराभव हा आमचा शेवटचा पराभव असेल. आम्ही या पराभवाचा वचवा पंचायत आणि झेडपीच्या निवडणुकांत काढू, असा इशारा दिला.

दुसरीकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सोमामई यांचा दारून पराभव झाला. यानंतर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) , सेवा सहकारी संस्था (महिला), सेवा सहकारी संस्था (ओबीसी), सेवा सहकारी संस्था (भविजा), ग्रामपंचायत (सर्वसाधारण), ग्रामपंचायत(अनु. जाती व जमाती), ग्रामपंचायत (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) आणि हमाल मापाडी मतदारसंघातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube