Kasba By Election : धंगेकरांचा रासनेंना दे धक्का.. तेराव्या फेरीत घेतली मोठी आघाडी

Kasba By Election : धंगेकरांचा रासनेंना दे धक्का.. तेराव्या फेरीत घेतली मोठी आघाडी

kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची (Kasba By Election) मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे. बाराव्या फेरीअखेर धंगेकरांनी आघाडी कायम ठेवली असून धंगेकर 4 हजार 821 मतांनी आघाडीवर आहेत. धंगेकर यांना एकूण 48 हजार 986 मते मिळाली आहेत. तर भाजप (BJP) उमेदवार हेमंत रासने यांना 44 हजार 165 मते मिळाली आहेत. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, यावेळी काँग्रेसने (Congress) या किल्ल्याला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

कसबा मतदारसंघाची निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. तसाही हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यावेळची परिस्थिती वेगळी होती. धंगेकरांनी यंदा भाजपला चांगलाच घाम फोडला आहे. निवडणुकीतील प्रचार त्यानंतर घडलेल्या घडामोडी तसेच मागील चाळीस वर्षांपासून भाजपचा आमदार असतानाही येथे फारसा विकास झाला नसल्याने मतदारांची नाराजी या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू झाली. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होत आहे. धंगेकरांनी येथे सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने म्हणाले होते, की मी दहाव्या फेरीनंतर आघाडीवर असेल मात्र तसे होताना दिसत नाही. तेराव्या फेरीतही धंगेकरांनी रासनेंना जोरदार धक्का देत जवळपास पाच हजार मतांची आघाडी घेतली आहे. आता मतमोजणीच्या फक्त सात फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube