Kirit Somaiya : हसन मुश्रिफांवर होणार कारवाई? न्यायालयाने केला मार्ग मोकळा

  • Written By: Published:
Kirit Somaiya : हसन मुश्रिफांवर होणार कारवाई? न्यायालयाने केला मार्ग मोकळा

Kirit Somaiya On Hasan Mushrif  : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते.

मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्या नंतर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की.. हसन मुश्रीफच्या समोर पुढच्या कारवाई संबंधीचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे. आता ED पुढची कडक कारवाई हसन मुश्रीफ यांचावर करू शकते. शेतकऱ्यांची फसवणूक, कोट्यावधी रुपयांचे मनी लाँड्रींग, बँकेशी गैरव्यवहार, शेकडो कोटींचा घोटाळा प्रकरणी हसन मुश्रीफ जेलमध्ये जाणार. मुश्रीफ साहेब आता बॅग भरून तयार राहा असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी ट्विट करत लगावला.

मागील काही महिन्यापासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED)च्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापेमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. तेव्हापासून त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमच्यावेळी मर्यादा, सुसंस्कृत पणा होता… आतासारखी टोकाची भूमिका नव्हती! 

काही दिवसापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. पण सेशन्स कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पण सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का? चौकशीला सामोरं जातात, हे पाहावं लागेल.

कर्नाटकात भाजपला धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

प्रकरण नक्की काय ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक फसवणुकीचे तसेच घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडी सध्या मुश्रीफ व त्यांच्या कुटुबीयांची चौकशी करत आहे. अनेकदा ईडीकडून त्यांच्या निवास्थानी छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube