सुजीत पाटकरने ईडीसमोर घेतले संजय राऊतांचे नाव; 32 कोटी 60 लाखांच्या कॉन्ट्रॅक्टचा फायदा झाल्याचा दावा
Kirit Somayya on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळा प्रकरणा चांगलचं चर्चे आहे. आता या घोटाळ्याबाबत (BMC covid scams) दोन दिवसांपूर्वी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार घोटाळ्याच्या पैशातून सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यात आली. ही बिस्किटे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला. दरम्यान, आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी याच कोविड घोटाळ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली आहे.
द सुपरहिरोची टक्कर! Harshvardhan Kapoor अन् रॉबर्ट पॅटिनसन यांचा सोहो हाऊस एन्काउंटर
कोविड घोटाळ्याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी ED ला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलं आहे.
संजय राऊतांच्या नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला. या कॉन्ट्रॅक्ट् संबंधी संजय राऊतांना माहित होते, असं सोमय्या यांनी सांगितलं. त्यामुळं आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलतांना सोमय्या यांनी पत्राचाळ घोटाळा आणि कोविड खिचडी घोटाळा यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. याच लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट् मिळाला, त्यातले पैसे संजय राऊताची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ईडीचे आरोपपत्र काय सांगते?
ईडीच्या आरोपांनुसार, 2020 मध्ये लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला दहिसर आणि वरळी जंबो कोविड केंद्रांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. लाइफलाइन पार्टनर संजय शहा यांनी सोन्याची बिस्किटे, बार आणि नाणी खरेदी केली. सुजित पाटकर यांच्यामार्फत बीएमसी अधिकारी आणि इतर व्यक्तींनी लाच म्हणून वाटप केल्याचा आरोप आहे. याशिवाय सुजित पाटकर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना 15 लाखांची रक्कमही दिली.
कथित कोविड घोटाळ्यात संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली. आता सोमय्या यांनी दावा केला की, पाटकर यांनी राऊतांच्या राऊतांच्या नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला याची राऊतांना कल्पना होती. यामुळं राऊतांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा लागू शकतो. दरम्यान, सोमय्या यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊत काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.