काळे गटाला धोबीपछाड देत शिंगणापूरात कोल्हे गटाचे वर्चस्व

काळे गटाला धोबीपछाड देत शिंगणापूरात कोल्हे गटाचे वर्चस्व

अहमदनगर : कोपरगांव तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली आहे. यात सरपंच पदासह १४ जागावर विजय मिळवला आहे. तर यात आ. काळे गटाला मात्र केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ. काळे गटाने सलामी दिली आहे. यात कोल्हे गटाला केवळ दोन जागांवर म्हणावे लागले आहे. तर भोजडे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासह सर्वच्या सर्व ९ जागा काळे गटाने पटकावल्या आहेत.

खिर्डी गणेश ग्रामपंचायत सरपंच पदासह आठ जागा कोल्हे गटाने पटकावल्या आहेत. तर सत्ताधारी परजणे गटास केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर कोळपेवाडी हा पारंपरिक गड काळे गटाने सरपंच पदासह नऊ जागा पटकावून कायम राखला आहे. तर कोल्हे गटास ४ जागा मिळाल्या आहे.

चांदेकसारे येथे सरपंच पदासह काळे गटास ११ जागा प्राप्त झाल्या आहे. कोल्हे गटास 2 जागा प्राप्त झाल्या आहेत. सरपंच पदी किरण विश्वनाथ होन हे विराजमान झाले आहेत. डाऊच खुर्द ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे संजय गुरसळ सरपंच पदी विजयी झाले आहे. तर वेस-सोयगाव ग्रामपंचायत निवडणुकित अपक्ष गटाने सरपंच पदासह चार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.

दरम्यान बहादरपूर या कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायत आ.काळे गटासह अन्य सहकारी गटांनी बाजी मारली असून सरपंच पदासह सर्व जागा गमावल्या आहेत.दरम्यान वडगाव, पढेगाव, शहापूर, आदी ठिकाणी सरपंच पद काळे गटाने आपल्या पदरात पाडून घेतल्या आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube