तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहाद? राम कदमांचा इशारा

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहाद? राम कदमांचा इशारा

मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी एक मोठं विधान केलं आहे. तुनिषा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल, तसंच या मागे कोणत्या संघटना आहेत हे शोधून काढलं जाईल, असं राम कदम म्हणाले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार टुनिशा आणि शिझान खान यांचं 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं, त्यामुळे टुनिशा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती.

तणावामुळे तिने आत्महत्या केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.मात्र आता पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक टप्प्यावर तपास करत आहेत. तुनिषाच्या मृतदेहाचं मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत.

तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या सहकाऱ्यांचीही पोलीस चौकशी सुरू आहे. तुनिषाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं? याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. षडयंत्र रचणारे कोण आहेत, याचाही तपास केला जाईल, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube