ठाण्यात नीच आणि घाणेरड राजकारण… म्हस्के यांच्या डोळ्याला कावीळ; विनायक राऊतांचा हल्लाबोल

ठाण्यात नीच आणि घाणेरड राजकारण… म्हस्के यांच्या डोळ्याला कावीळ; विनायक राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : परवा ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाली. दरम्यान, त्यानंतर ठाकरे गट चांगलाच सक्रीय झाला असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला. तर आता खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) देखील शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण करण्यात आली, पण त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला असून हे अतिशन नीच आणि घाणेरड राजकारण सुरू असल्याचं ते म्हणाले.

ठाण्यात कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जबर मारहाण केली. सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी पोस्ट लिहिल्यानं त्यांना ही मारहाण झाल्याचं बोलल्या जातंय. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची चौकशी व्हावी, याची मागणी केली. मात्र, त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल रोशनी शिंदे यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले.
NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता भुई

दरम्यान, याविषयी बोलतांना विनायक राऊतांनी यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, निरापराध रोशनी शिंदे यांना गदारांच्या टोळक्याने मारहाण ठाण्यात केली आहे. ज्या टोळक्याने रोशनी यांना मारहाण केली, त्यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. उलट रोशनी शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे अतिशय घाणरेडं आणि नीच राजकारण ठाण्यात सुरू आहे, असं ते म्हणाले. मात्र, रोशनी शिंदे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत.
आज रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीसाठी धिक्कार करण्यासाठी आणि पोलिसांच्या निष्क्रिय आणि पक्षपाती भूमिकेविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. अनेक लोक रोशनी शिंदे यांच्यासाठी मोर्चात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोर्चात विनायक राऊत, खा. राजन विचारे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे विक्रात चव्हाण हे सहभागी आहेत, असं त्यांनी सांगितं.

शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी सांगितलं होतं की, रोशनी शिंदे यांना मारहाण झालीच नाही. दरम्यान, म्हस्के यांच्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. नरेश म्हस्के यांच्या
डोळ्याला कावीळ झालं असेल. त्यामुळं रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण त्यांना दिसली नसेल. शिंदे गटाच्या माजी महापौर असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रोशनी शिंदे यांना मारहाण केली, मात्र, त्यांना झालेली मारहाण ही जबर स्वरूपाची नाही. महिला कार्यकर्त्यांनी कबुल केलं. पण, हे कबुल करायला तयार नाहीत.

आज आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहोत. उद्धव ठाकरे भेटायला येतात म्हटलं की, आयुक्त पळून गेले. आणि शिंदे गटाचे नेते भेटायला गेले, तेव्हा त्यांना आयुक्त भेटले. त्यामुळं पोलिस हे निपक्षपातीपणा करत आहेत. ते रक्षनकर्ते आहेत की, नाही याचा जाब विचारायचा आज त्यांना विचारणार आहे, असं त्यांना सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube