बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट; विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘पन्नास खोके, एकदम ओके’ …अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सोळावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने करत सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग
महाविकास आघाडीचे आमदार आक्रमकपणे आंदोलन करत असताना सत्ताधारीही आंदोलन करु लागले. मात्र ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधार्यांच्या आंदोलनाची हवाच निघून गेली. आपल्याला माध्यमात जागा मिळत नाहीय हे लक्षात येता कुरघोडी करत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या समोर येऊन सत्ताधारी आंदोलन करत माध्यमांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र तरीही ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधाऱ्यांची गोची झाली. मात्र माध्यमांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनालाच जास्त महत्व दिल्याचे पाहायला मिळाले.
Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार
दरम्यान, आज भाजप व शिंदे गटाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरुन भाजप व शिंदे गटाने राहुल गांधींच्या फोटोलो जोडेमारो आंदोलन केले.