Maratha Andolan : दोषींवर कठोर कारवाई करणार; अजितदादांनी दिला शब्द

Maratha Andolan : दोषींवर कठोर कारवाई करणार; अजितदादांनी दिला शब्द

Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेमुळे सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Andolan) मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Maratha Aandolan : गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज, सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर (Maratha Andolan) तसंच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरू असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था कायम राहिल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करू. राज्यातील नागरिकांनी शांतता पाळून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

गृहमंत्र्यांच्या आदेशानेच लाठीचार्ज – पटोले

गृहमंत्री यांच्या आदेशाने झालेल्या लाठीचार्जचा (Maratha Andolan) निषेध आम्ही निषेध करतो. हे महायुतीचं सरकार सुलतानी सरकार आहे, याचा प्रत्यय वारंवार येतो. स्वतःसाठी जगणारं सरकार आहे, हे सरकार केवळ लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांना अधिकार नसतांनाही चुकीचा कायदा आणून आम्ही मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. 24 तासात आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. आणि आता लाठीचार्ज केला. हे म्हणजे, उलट्या चोराच्या बोंबा आहेत, अशा शब्दात पटोलेंनी फडणवीसांवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube