सोमय्यांची अनेक लफडी, ईडीकडूनच त्यांना मिळते कमिशन; चंद्रकांत खैरेंचे गंभीर आरोप

सोमय्यांची अनेक लफडी, ईडीकडूनच त्यांना मिळते कमिशन; चंद्रकांत खैरेंचे गंभीर आरोप

Chandrakant Khaire : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीची दुसऱ्यांदा छापेमारी आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीकडून झालेली अटक या घटनांवरून राजकारणाचा पारा वाढला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार राजकारण सुरू आहे. या गदारोळात आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले, की ईडीच्या पैशांतून सोमय्या यांना कमिशन मिळते. हे असेच असतात. आयकर विभागाला ज्या खबऱ्याने माहिती दिली त्या खबऱ्याला काहीतरी द्यावे लागते. तसंच यांचं काम आहे, असा आरोप त्यांनी केला.

 वाचा : बदलीसाठी पैसे घेतले, खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

ईडी कारवाई करणार हे त्यांना कसे कळते. कोणाकडे धाड पडणार आहे, कुणाला अटक होणार आहे, हे कसे समजते. सोमय्यांची स्वतःची अनेक लफडी आहेत. सरकार येते आणि सरकार जाते त्यांचे पुढे काय होते ते पाहा असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.

चक्क सॅटेलाइटद्वारेच EVM चा ताबा, यामागे मोठे षडयंत्र; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

या कारवाईच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारी पक्षावर टीकेची झोड उठविली आहे. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर किरीट सोमय्या यांची चांगलीच पोलखोल केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती ट्विट केले, त्यांना कसा त्रास दिला याची यादीच त्यांनी वाचली. हे नेते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेल्यावर किरीट सोमय्या कसे गप्प होतात हे ही त्यांनी सांगितले. उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम भाजपमध्ये यायचे  म्हणतील तर सोमय्या काय करणार, असा सवालही त्यांनी  केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube