Maharashtra Politics : ..तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल! ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics : ..तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल! ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू (MLA Disqualification Case) आहे. अद्याप यावर निकाल आलेला नाही. मागील दीड वर्षांपासून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. यात आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठी वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. खैरे यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात राजकीय भूकंप होईल, असा दावा केला.

नांदेड दुर्घटना! नर्सेसच्या बदल्या, डॉक्टरांची कमतरता; चव्हाणांनी सांगितली सत्य परिस्थिती

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल. आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल, असे खैरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी धार्मिक माणूस आहे. मी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी पूजा करतो. त्यामुळे मला माहिती आह की कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल. या निकालाबाबत ज्यावेळी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करतो तेव्हा एकच उत्तर निघते ते म्हणजे, 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यांच्या मित्रपक्षाचे लोक देखील तेच म्हणत आहेत. जर हे घडलं तर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडू शकतो.

ते पुढे म्हणाले, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विजय झालाच पाहिजे असं म्हणतो. कारण की मी जर त्यांचा विजय होईल असं म्हटलं तर तर तुम्हाला कसं माहित असं विचारलं जाईल.

MLA Disqualification : आमदार अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम; पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

13 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर रोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube