‘फडणवीसांना विसरा पण, बाळासाहेबांना तरी विसरू नका’; ‘त्या’ जाहिरातबाजीवर भुजबळांचा संताप

‘फडणवीसांना विसरा पण, बाळासाहेबांना तरी विसरू नका’; ‘त्या’ जाहिरातबाजीवर भुजबळांचा संताप

Chagan Bhujbal : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या जाहिरातबाजीवर प्रश्न विचारला. भुजबळ म्हणाले, त्या जाहिरातीचं मला खरंच आश्चर्य वाटतं. अशा जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्याबरोबर अमित शाह आणि नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. पण मला आज आश्चर्य वाटले ते म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस एकदमच गायब झाले. ही मोठी झेप आहे शिंदे साहेबांची.

Shinde vs Fadnavis : सर्व्हेपेक्षा निवडणुकीतील कौल महत्वाचा; बावनकुळेंनी फेटाळला शिंदेंचा दावा

बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात आणि बाळासाहेबांचा फोटो नसतो हे देखील आश्चर्यच आहे. शिंदे फडणवीसांना विसरले तर विसरू देत पण निदान बाळासाहेबांना तरी विसरू नये. याआधीही अनेक सर्व्हे आले. हा सर्व्हे कुणी केला याची मला काही कल्पना नाही.

पन्नास लाख त्यांच्यासाठी किरकोळ

यामुळे वाद वाढतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भुजबळ म्हणाले, वाद जाहीर नसले तरी मनं दुखावले जातात. कल्याण लोकसभेचा वाद उघड्यावर होत आहे. पण ते सावरण्यासारखे आहे. पण असं जेव्हा होतं (फडणवीस यांचा फोटो नाही) त्यावेळी हा विषय कार्यकर्ते, सामान्य लोक यांच्यापर्यंत जातो. यामुळे मनातली एकता कमी होते. माझा जरी एखादा फोटो नसला, तरी मला वाटतं, माझा का नाही फोटो ? कार्यकर्ते ताबडतोब म्हणतात, तुमचा फोटो नाही. पाच पन्नास लाखांची जाहिरात झाली असेल. अर्थात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे 50 लाख काय जास्त वाटत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube