Mahrashtra Politics : तुमचे नाही का ? अल्कोहोल, बिस्लरीचे कारखाने, भुमरेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर
औरंगाबादः पैठणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी घेरले होते. भुमरे यांचे दारूची दुकाने आहेत. ग्राहक येण्यासाठी दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर कसे टाकले, यावरून पवारांनी भुमरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्याच्या घरी गेला होता. त्याचे दारूचे दुकाने आहेत. ते थोडे पानफुलं विकतात, तुमचे ही कारखाने सर्वांना माहिती आहे, असे प्रत्युत्तर भुमरे यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी पैठण येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला होता. त्यात भुमरे दारूचे दुकाने काढण्यात व्यस्त आहेत. हा अनेकांचे संसार उद्धवस्त करत आहे. त्यांच्या संसाराची राखरांगोळी करत आहे, जनतेचे काही देणे घेणे नाही. पी फक्त दारू, असा निशाणा अजित पवारांनी साधला होता. त्यावर मंत्री भुमरे म्हणाले, दादा तुम्ही पैठणच्या सभेनंतर त्याच्या घरी चहाला गेला होतात, त्याचेही पैठणला परमीट रुम आहे. तो थोडी पान फुलाचे दुकान चालवतो.
‘जो चुकणार त्याला ठोकणार’… Sambhajiraje Chatrapati यांचा इशारा कोणाला ?
भुमरे म्हणाले, माझे एखादे, अर्ध दुकाने आहे. तुमचे नाही का अल्कोहोल, बिसलरीचे कारखाने. तुम्ही तेथे काय बनवता आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत अजित पवार यांनी पैठणला सहा सभा घेतल्या आहेत. आणखी पंचवीस सभा घेतल्या तरी 2024 ला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार होणार आहे, असे आव्हान ही त्यांनी अजित पवारांना दिले आहे.
अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलेल्या शपथविधीवरून भुमरे यांनी पवारांना डिवचले आहे. पहाटेच्या वेळी तुम्ही शपथविधी केला होता. त्यावेळेस नाही का तुम्ही गद्दारी केली. खरी गद्दारी दादांना केली आहे. पहाटे शपथविधी केली आहे. त्यांना अधिकार नाही आम्हाला गद्दार म्हणण्याचा, असा टोलाही भुमरे यांनी लगावला आहे.