Maharashtra Politics : ‘तुमचं तिकडे काही चाललं नाही…’; सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला

Maharashtra Politics : ‘तुमचं तिकडे काही चाललं नाही…’; सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला

अमरावती : जर नवनीत राणा यांना वाटत असेल त्या फार हुशार आहेत. सुंदर अँक्टर आहे. तर नवनीत राणा यांनी गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचं बॉक्स ऑफिसवर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही इकडे आल्यात. नाहीतर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, नवनीत अक्काचे (navneet rana) जुने व्हिडिओ भर सभेत दाखवून सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा (sushma andhare) यांचा समाचार घेतला.

खासदार नवनीत राणा या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवली. मोदींना बच्चा म्हणणाऱ्या नवनीत राणा आता उधळत आहेत. मोदींवर मुक्ताफळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आधार घेऊन लोकसभा निवडणूक लढवताना मोदींच्या विरोधामध्ये प्रत्येक भाषणात आग ओकतांना शरद पवार यांचा उल्लेख बाप बाप होता है असे करत, मोदींचा उल्लेख बच्चा म्हणून करत होत्या.

आता निवडून आल्यावर मात्र त्यांनी रंग बदलला आहे, ज्या मोदींवर टीका करून त्यांनी मत मिळवली आहेत, आज त्याच मोदींवरच मुक्ताफळ उधळण्याचे काम नवनीत रणा करत असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला. वादग्रस्त विधान करत केवळ चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा हे खोटे बोलण्यात आणि लोकांची फसवणूक करण्यात तसेच नवटंकी करण्यात माहीर असल्याचे देखील सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे.

हल्ल्यामागे कोरोनातील भ्रष्टाचाराचे मूळ, हल्लेखोर आम्हाला माहिती; संदीप देशपांडेंचे आरोप

चार ते पाच महिने अगोदर नवनीत राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे दम नाही. त्यांच्या या वाक्यावर आपल्याला काय बोलायचे. अशा बोलण्यावर आपण काय विचार करायचे आपण चांगली माणस आहोत. आपण सज्जन आणि सभ्य माणस आहोत. अक्काला मराठी बोलता येत नाही मराठीतले अर्थ समजत नाही. यामुळे बिचारी अक्का असे काहीही बोलली. तरीपण आपण उद्धव ठाकरेंमध्ये दम आहे की नाही हे अक्काला सांगितले पाहिजे. पाठची बहीण म्हणून मी उद्धव ठाकरेंना वचन दिले आहे की, तुमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्यांना मी आपण काय आहोत ते दाखवून देणार आहोत.

उद्धव ठाकरे यांच्यात किती दम आहे. हे नवनीत राणांना समजून घ्यायचे असेल तर गेल्या ७ महिने ४० गद्दार, १०५ भाजपचे आमदार. पक्षपाती राज्यपाल, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र अशा ३-३ राज्यांच्या यंत्रणा दोन राज्यांचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान एवढेच नव्हे तर ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि व्हाट्सअप तसेच फेसबुकवर हजारो लावारिस पेड फॉलोवर्स या सगळ्यांना ७ महिन्यांपासून ज्यांनी कामाला लावला आहे. ते उद्धव ठाकरे आहेत, यामुळे आमचा नाद करायचा नाही, हे कुणीतरी नवनीत राणांना सांगावे असा जोरदार हल्लबोल सुषमा अंधारे केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube