‘मिशन 45’ काही मोठी गोष्ट नाही.. शरद पवारांच्या आवाहनाला फडणवीसांच उत्तर

  • Written By: Published:
‘मिशन 45’ काही मोठी गोष्ट नाही.. शरद पवारांच्या आवाहनाला फडणवीसांच उत्तर

पुणे : ‘मिशन 45’ काही मोठी गोष्ट नाही. दोन वेळा आम्ही 43 सीट राज्यात आणून दाखवल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचं मिशन पूर्ण करू शकतो, असा विश्वास भाजप नेते आणि राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज (ता.5 जानेवारी) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला

फडणवीस म्हणाले, आम्हाला असं वाटतं की आम्ही ‘मिशन 45’ पूर्ण करू शकतो. त्यामुळे आम्ही हे मिशन राबवत आहे. याआधी दोन वेळा राज्यात 43 खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे ‘मिशन 45’ काही अवघड काम नाही, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यावर केलेल्या टिकेनंतर फडणवीस आणि प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपच्या ‘मिशन 45’वर टीका करताना मिशन 48 ठेवायला हवे, अशी खोचक टीका केली होती. तर अजित पवार यांनी विधानसभेसाठी मिशन 288 करा, असा उपरोधिक टोला लगावला होता.

फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यावरून सुरू झाल्या वादावरही भाष्य केले.ते म्हणाले, कुणी काहीही म्हटलं तरी संभाजीराजे हे धर्मवीरच होते, आणि हे मान्य न करणं म्हणजे द्रोह करण्यासारख आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात कुणीही हिंदू उरला नसता, अशा शब्दात फडणवीसांनी आपलं मत व्यक्त केलं.

तसेच शरद पवार यांना आम्ही जाणता राजा म्हणू असं मत व्यक्त भुजबळांनी व्यक्त केला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, कुणाला काय म्हणायचं आहे ते म्हणा मात्र जाणते राजे हे एकच होते आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून जनता ते म्हणतील तसं काही म्हणणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, सत्ताधाऱ्याने विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. हे थांबवायला पाहिजेत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यांच्या मताचा मी समर्थन करतो, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तरी सुप्रियाताईंचं तरी ऐकावं, अस खोचक आवाहनही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube