बच्चू कडू सत्तेत तरीही वंचित घटकासाठी सरकारविरोधात दंड थोपटले

बच्चू कडू सत्तेत तरीही वंचित घटकासाठी सरकारविरोधात दंड थोपटले

अमरावती : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुधाबाबत त्यांनी सरकारला घेरलं होतं. यानंतर त्यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटलेत. आता कडू यांनी शेतकरी, शेतमजून, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर (Amravati Divisional Commissioner Office) मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. बच्चू कडे हे स्वत: सत्तेत सहभागी असतांना ते आपल्याच सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (MLA Bachchu Kadu will take out a march against the Grand Alliance government)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

राज्यात 2022 मध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाच्या वेळी बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. मात्र, त्यानंतरही त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. याच कारणावरून कडू यांनी वारंवार शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. मात्र, बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 9 ऑगस्ट रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाविषयी बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी अमरावतीत 9 ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. वंचित, कामगार यासारख्या मुद्दावर राज्यातील लोक आम्हाला एकत्र करायचे आहेत. ज्यांचा कोणी नाही, त्यांचा आवाज होण्याचं काम आम्ही करतो.

Ahmedanagar News : शिवरायांबद्दल अपशब्द! ‘त्या’ युवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा… 

आपल्याच सरकारविरोधात मोर्चा का काढत आहात, असं विचारल्यावर ते म्हणाले, सत्तेत असून मोर्चा काढू नये अशी कुठे घटनेत आणि कायद्यात तरतूद नाही. आम्ही जेव्हा पाठींबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यानेही म्हटले नाही की सत्तेत असून मोर्चा काढू नये, असे काही बंधन नसते. मोर्चा सोबत ही चळवळ आहे ही चळवळ आम्ही राज्यभर चालवणार आहोत. शेतकऱ्यांना साप चावला तर अपघात विमा तरी भेटतो. पण मजूराला तेही भेटत नाही. किमान त्यासाठी एखादी योजना करावी. भांडे घासणाऱ्या महिलांसाठीही ठोस योजना होणं गरजेचं आहे. शेत मजुरांनासाठी योजना नाही, प्रकल्प ग्रस्त शेतकरी, कंत्राटी कामगार, पेरणी ते कंपनी पर्यंतचे काम MREGS मधून व्हावे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहे. खूप प्रश्न आहेत. एकट्या बच्चू कडूंच्या आवाजाने होणार नाही, याला जनतेचा आवाज सुद्धा लागेल, असं कडू म्हणाले.

दरम्यान, सरकारमधील आमदारानेच सरकारविरोधात मोर्चा काढण्याचं ठरवल्यां आता तरी राज्य सरकार शेतकरी, वंचित घटनांना मदत करणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube