पंकजा मुंडेंसाठी कॉंग्रेसचाही दरवाजा खुला; बाळासाहेब थोरातांची ऑफर

पंकजा मुंडेंसाठी कॉंग्रेसचाही दरवाजा खुला; बाळासाहेब थोरातांची ऑफर

mla balasaheb thorat invite bjp leader pankaja munde to join congress party : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षावर नाराज असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यांनी अनेकदा आपली खदखद बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझी आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. तर आज मी वादळाची लेक आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिला. पंकजा मुंडेंसाठी कॉंग्रेसचाही दरवाजा खुला असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, मला एक माहिती आहे, मी इतके वर्ष राजकारणात आहे. गोपीनाथ मुंडे सोबत आम्ही एकत्र काम केलं. आमचे पक्ष वेगळे असले तर आम्ही एकमेकांशी कनेक्ट होतो. कामानिमित्त भेटायचो तेव्हा तेव्हा सतत वाटायचं की, गोपीनाथ मुंडेवर अन्याय केला जातोय. त्यामुळं ते देखील काही काळ नैराश्येत गेले होते, असं थोरात म्हणाले.

थोरात म्हणाले, पंकजा मुंडेच्या मनातही अन्यायाची भावना येत असावी, हे नाकारता येत नाही. त्यामुळे त्या असं काही बोलल्या असाव्यात. एक पक्ष उभारण्यात मुंडे घराण्याचा त्याग बा खूप मोठा आहे. त्यांच्या मनात असं येणं हे योग्य नाही, असं थोरात म्हणाले.

पुणेकरांसाठी फडणवीसांचे मोठे गिफ्ट; कोटींची गुंतवणूक अन् हजारो नोकऱ्या

मी भाजपची आहे, पण भाजप थोडी माझा आहे, असं वक्तव्य केल्यानं त्या पुन्हा एकदा पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.आता त्या NCP जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अशात थोरातांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, पंकजाताईंसाठी तर सगळ्यांचे दरवाजे खुले आहेत. कॉंग्रेसचाही दरवाजा खुले आहे, असं विधान केलं.

काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलून दाखवलं होतं. तेव्हा त्या भाजपात नाराज असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर त्या आता पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. अशातच आज आज राष्ट्रवादीते नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी मी वादळाची लेक आहे. वादळ येणार होते, मात्र, त्याची दिशा बदलली, असं वक्तव्य केलं. त्यामुळं पंकजा मुंडेंची पुढची वाटचाल कशी असेल हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube