भाजपसोबत जाणाऱ्या लोकांचा.., आमदार रोहित पवारांचे टीकास्त्र

भाजपसोबत जाणाऱ्या लोकांचा.., आमदार रोहित पवारांचे टीकास्त्र

पुणे : जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल, याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा सवालही पवार यांनी उपस्थित करत भाजपवर टीकास्र सोडले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही, यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होतं.

भाजपने ज्या ज्या ठिकाणी एमएलसीचे उमेदवार दिले आहेत, त्यामध्ये शिंदे गटाला कुठेही न्याय मिळाला नाही. याचाच अर्थ असा आहे की, कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल, याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

तसेच यापूर्वी अनेकांनी मान्य केले आहे की, जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच. सध्या शिंदे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यावधी निवडणुका लागल्याच पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षांची खरी ताकद कळेल.

हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेलं सरकार आहे. बदला घेण्यासाठी जे सरकार स्थापन होत असते त्यात व्यक्तीगत हीत जास्त असते. जिथे व्यक्तिगत हीत अधिक असते ते सरकार लवकर पडत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागतील, असं वाटत त्यांनी म्हंटलंय आहे.

मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची पिछेहाट होतेय, असा सर्व्हे रिपोर्ट असल्याचंही त्यांनी म्हटंलय. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत.

दरम्यान, मोदींनी घेतलेली सभा पाहता पुढच्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल, असं दिसत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा करत विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना तत्कालीन महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube