Sanjay Raut : त्यांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही; राऊतांची खोचक टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 10T123719.659

Sanjay Raut criticise Raj Thackeray :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray )  यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा (MNS ) काल 17वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी देखील टोला लगावला होता. यावरुन आता राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाणे इतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असा खोचक टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.  महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार व मुख्यमंत्रीपद का गेलं? हे पुर्ण जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.  महाराष्ट्राचे सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके होते, असे राऊतांनी सांगितले.

ईडीचा अनुभव हा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे, असाही खोचक टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.  याआधी राज ठाकरे यांनी काल बोलताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. मनसेच्या वाटेला गेल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना निशाणा साधला आहे. यावरुन राऊतांनी त्यांना आता उत्तर दिले आहे.

BJP साठी गुडन्यूज! निवडणुकीआधीच खासदार करणार पक्षात प्रवेश, जाणून घ्या..

दरम्यान सध्या राज्यातील खत खरेदीवरुन देखील राजकारण तापले आहे. यावरुन देखील राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.   महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारने जात आणि धर्मावर राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवाल अशा प्रकारचा जात दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, असे राऊत म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube