‘मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला भरा’; मलिकांच्या आरोपांनंतर राऊतांचा हल्लाबोल

‘मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला भरा’; मलिकांच्या आरोपांनंतर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आज अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर देशातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी सरकारला टार्गेट करणे सुरू केले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

ते म्हणाले, मलिक यांनी केलेला हा काही मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहित होती. त्यावेळचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील हे माहित होतं, हेच आता दिसून आलं आहे.

हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला होता. 150 किलो आरडीएक्स त्या ठिकाणी गेले. आरडीएक्स पोहचले कसे ? पुलवामा रस्त्यावर जवान का पाठवले? त्यांच्यासाठी विमान का पाठवले नाही? की त्यांची हत्या करावी आणि निवडणुका जिंकायच्या असा आरोप केल्यावर आमच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला.
मात्र आज सत्यपाल मलिक यांनी थेट सत्य मांडले. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे. आणि जे दोषी आहेत. जे मंत्री त्यांचे कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच ही हत्या झाली आहे. राजकीय लाभ घेण्यासाठी या हत्येचा फायदा केला गेला. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

अमित शाह मुंबईत, पण चंद्रकांत दादा कोल्हापूरात? ‘त्या’ वक्तव्यावरची नाराजी कायम?

मलिकांनी आधीही केली मोदींची कोंडी 

सत्यपाल मलिक हे नेहमीच केंद्र सरकारवर टीका करत आले आहेत. विशेष म्हणजे, मोदींच्याच कार्यकाळात ते जम्मू काश्मीर आणि त्यानंतर मेघालयाचे राज्यपाल होते. याआधी कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबाबतही त्यांनी धक्कादायक वक्तव्य करत मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक वक्तव्ये करत खळबळ उडवून दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube