मुश्रीफांचा फोटो ट्विट करत राऊतांचं सूचक विधान; ‘उद्याच देवेंद्रजींकडे…’

मुश्रीफांचा फोटो ट्विट करत राऊतांचं सूचक विधान; ‘उद्याच देवेंद्रजींकडे…’

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agencies) गैरवापराविषयी विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिलं होतं. तरीही तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांना लगात बसला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील घरावर काल पुन्हा एकदा ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात ईडीकडून मुश्रीफांवर दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवरून विविध राजकीय प्रक्रिया येत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी कारवाईवरुन भाजप, किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला.

मुश्रीम यांच्या निवासस्थानी काल ईडीने छापा टाकला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणाच्या चौकशीसाठी ही कारवाई झाल्याची माहिती आहे. काल दिवसभर मुश्रीफांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मुश्रीफ घरी नसल्यानं यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाच जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. ईडीने मुश्रीफ यांनी चौकशीसाठी समन्स पाठवले असून उद्या मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश ईडीनं दिला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी कारवाईवरून भाजपवर जोरदार टीका केली.

राऊत यांनी ट्विट करत लिहिलं की, मुश्रीफ यांच्या सेनापती घोरपडे साखर कारखाण्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यामध्ये जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे, असा आरोप राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. मग तरीही ED इथे गप्प का? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतांनाचा फोटोही पोस्ट केला आहे.

अंधारेंचा गंभीर आरोप, सदानंद कदमांवरील कारवाईमागे एक लाख एक टक्के रामदास कदम

दरम्यान, उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजींकडे पाठवत असल्याचं सुचक विधान केलं आहे. या ट्विटमध्ये राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पोपटलाल असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, आता उद्या संजय राऊत देवेंद्र फडणवीसांकडं कोणत्या भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण पाठवणार आहेत, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube