Kasba Peth Election : कसब्या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळकांच्या पतीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Kasba Peth Election  : कसब्या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळकांच्या पतीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी घेतली आहे.

कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनामुळे या मतदार संघात 27 फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. पोट निवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ही निवडणुक चांगलीच रंगणार असल्याचे दिसुन येत आहे.

दरम्यान, शैलेश टिळक म्हणाले, मुक्ता टिळक यांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे.

तसेच जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे. माझा मुलगा कुणाल देखील चांगलं काम करत आहे. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीकडुन ठोंबरे इच्छुक…
कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) या देखील इच्छुक आहेत. याबाबत त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

निवडणुकीच्या या रिंगणात काँग्रेसने देखील रस दाखवला आहे. एकीकडे भाजपची तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतून काँग्रेसने (Congress) कसबा मतदार संघासाठी दावा केला आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावे पुढे आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube