सभा होऊ नये म्हणून पोलिसांवर नागपूरचा दबाव; चंद्रकांत खैरेंचा आरोप

सभा होऊ नये म्हणून पोलिसांवर नागपूरचा दबाव; चंद्रकांत खैरेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीतील तीन पक्षांची पहिलीच संयुक्त सभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात झाली आहे. ही वज्रमुठ सभा होऊ नये म्हणून, पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत बोलतांनी त्यांनी हा आरोप केला.

चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलतांना शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ८ मे 1988 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची या मैदानावर सभा झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, औरंगजेबाचं नाव कशाला पाहिजे, संभाजीनरच नामकरण करा, आणि तेव्हापासून आम्ही संभाजीनगरच म्हणत आलो, असं खैरेंनी सांगितलं.

ते म्हणाले, अनेकांच्या सभा या मैदानावर आहेत. मागच्या ८ जुनला उद्धव ठाकरेंची सभा झला होती. खेडला किती मोठी सभा झाली. मात्र, मिंधे गट उगाच बडबड करत राहतात. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनं अडीच वर्षात चांगल काम केलं. आता कोरोनाची लाट येतं आहे मात्र, मिधें गटाचं तिकडे लक्ष नाही. महाविकास आघाडीच्या काळात कोरोना असतांना दोन लोकांनी अहोरात्र काम करून सामान्य नागरिकांचे जीव वाचवले. एक आहेत तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि दुसरे उद्धव ठाकरे. आणि सत्ताधारी टीका करतात की, ठाकरे घरी बसून काम करतात. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज कुठंही काही बोलताच. शिवसेना फोडण्याच काम फडणीसांनी केलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते खरंच बोलले. मात्र, सावंतांनी एवढंच खरं सांगिलतं. बाकीचं ते काहीही खरं बोलत नाहीत. उगाच बडबड करत राहतात.
Dhananjay Munde : कमळाच्या फुलाने जनतेला एप्रिल फुल बनवलं!

महाविकास आघाडीची ही सभा सभा होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न झाले. दोन गटात राडा घडवून आणायचा आणि सभा रद्द करण्याचा काहींचा प्रयत्न होता. त्यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप खैरे यांनी केला. आज सावरकरांची जयंती नाही, पुण्यतिथी नाही. मात्र, आज त्यांनी मुद्दाम गौरव यात्रा काढली. खरंतर सावरकर जंयती पुण्यतिथी आम्ही सुरू केली. ते कधी सावरकरांच्या कार्यक्रमाला आले नाही. ठाण्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकाळी सावरकरांची गौरव यात्रा काढली. आणि मुद्दाम संभाजीनगरमध्ये यात्रा सायंकाळी काढली. त्यांनी सावरकरांच्या विचारांशी काही कर्तव्य नाही. आम्ही मागणी केली होती की, सावरकरांना भारतरत्न द्या. त्यांनी सावरकरांना भारतरत्न दिला नाही. आणि आता त्यांच्या नावाने यात्रा काढता आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री-उमुख्यममंत्री हे फक्त राजकारण करण्याासाठी सावरकरांचा उपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, यावेळी बोलतांना खैरे यांनी खासदार जलील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मागील गेल्या 28 वर्षात मी कुठंही संभाजीनगरमध्ये दंगल होऊ दिली नाही, आणि आता चुकून निवडणून आलेले इम्तियाज जलील हे खासदार झाले तेव्हापासून दंगली घडत आहेत, असा आरोप त्यांनी केला. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये दंगली लावायचा हा या सरकारचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube