Nana Patole : काँग्रेसचे ठरलंय एकला चलो रे? लोकसभेसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात देणार उमेदवार

  • Written By: Published:
Nana Patole : काँग्रेसचे ठरलंय एकला चलो रे? लोकसभेसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात देणार उमेदवार

Nana Patole : सध्या देशभरात लोकसभेचे वारे वाहत आहे. राज्यात देखील सर्व पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागेल आहेत. महाविकास आघाडीकडून तर जागा वाटप देखील जवळपास निश्चित झाले आहे. तशा आशयाची एक पोस्ट मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. यामध्ये काँगेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 15, ठाकरे गट 13 अशा जागावाटप दिलेल्या. परंतु ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 19 जागांवर अडून बसले आहे. त्यामुळे महविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अशातच काँग्रेसने 48 लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरु केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे दिसत आहे. कालपासून काँग्रेसच्या वतीने राज्यातील लोकसभेच्या मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे. आता पर्यंत काँग्रेस पक्षाने 38 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे. राहिलेल्या 10 मतदार संघाचा आढाव लवकर घेतला जाईल. सर्व मतदार संघात नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद काँग्रेसला मिळत आहे. सध्या राज्याची जी वाताहत झाली आहे. सर्वच क्षेत्रात राज्यातील आणि केंद्रातील सरकार नापास झाले आहे. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो, वाढती महागाई, बेरोजगारी, यामुळे एक राग जनतेच्या मनात तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनात दिसत आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने ही तयारी सुरु केली आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली.

पंकजा मुंडेंचा आक्रमक बाणा, खडसेंशी चर्चा; ऐन पावसाळ्यात मराठवाड्याचं राजकारण तापणार?

टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकी नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार नवीन नवीन घोषणा दर वेळेस करत पण त्या अमलात आणल्याजात नाही. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यसरकाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना आणली आहे. परंतु एकीकडे शेतकरी उधवस्त होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत नाही. आणि नुसत्या घोषणा करत आहे. असे म्हणत नानाने सरकारवर हल्ला चढवला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube