आदित्य ठाकरे यांची एकदा नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
माध्यमांशी बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरे वर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहे. A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच अशा कडक शब्दात राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान शिंदे गटातील आमदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच लोकसभेमध्ये दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सनसनाटी आरोप केले होते. त्यांनतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शेवाळे यांच्या आरोपांनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले की, महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहे मात्र जेव्हा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरे यांचाच उल्लेख का होतो. इतरांचा का होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठे दाल मे कुछ काला है, असा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला.
केस पुन्हा ओपन करा
दिशा सालियन प्रकरणाची केस मुंबई पोलिसांकडे आहे, तर सीबीआय केवळ सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुंबई पोलीसच या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की, दिशा सालियन प्रकरणाची केश पुन्हा एकदा रिओपन करा.