Gunratna Sadavarte: ‘राजकीय नेत्यांची नार्को टेस्ट करा’, सदावर्तेची मागणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली. या दाव्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दुजोरा दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा दावा केला. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होतो, त्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी (Police) चौकशीसाठी बोलावल्यावर माझ्याकडून आणखी काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.
नागपूर, आरएसएस, राईटविंग आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच मुद्द्यांभोवती तपास फिरवला जात होता. एसटी आंदोलकांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता, त्यावेळी त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. डीसीपी निलोत्पल यांनी रात्री बोलावून माझ्याशी पवारांच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा कमी तर नागपूर RSS आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले जात होते, काही देखील करून त्यांना माझ्या तोंडवून वेगळंच काही वदवून घेण्याचा प्रयत्न सुरु होतं, त्यासाठी हा कट रचला गेला होता, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील, संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या तोंडून त्यावेळी कट असा शब्द निघाला होता. दिलीप वळसे पाटील, अजित पवार, नांगरे पाटील यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या पुढाऱ्यांची बैठक होत असत, त्याला संजय पांडे उपस्थित राहत होते. या कटात आरएसएस व फडणवीस यांनाच अडकवायचं होतं, असा दावा सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.