मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवळांना राष्ट्रवादीकडून अभय ? देवेंद्र फडणवीसांचीही ठोस भूमिका
Narhari zirwal - प्रत्येकवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, अशी पक्षातील वरिष्ठांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
Narhari zirwal : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन नेते राज्यात गाजत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना नडले आहे. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओसमोर आला आहे. झिरवळ एका तृतीयपंथीय व्यक्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले आहे. झिरवळ आणि तृतीयपंथीय व्यक्तीने शासकीय निवासस्थानी पार्टी केल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून झिरवळांवर कारवाई होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिरवळांना अभय दिले जात असल्याचे समोर आहे.
सध्या तरी झिरवळ यांची विकेट पडणार नसल्याचे चित्र आहे. कथित व्हिडिओ प्रकरणात झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीकडून मिळत आहे. प्रत्येकवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, अशी पक्षातील वरिष्ठांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे झिरवळ सध्या तरी सेफ आहेत. तसेच झिरवळांना संबंधीत तृतीयपंथीय व्यक्तीने ब्लॅकमेल केले असल्याचा दावाही केला जात आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेणार का?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्याप्रकरणात जवळचा व्यक्ती वाल्मिक कराडचा सहभाग आढळून आल्याने धनंजय मुंडे यांना अन्न व पुरवठा विभागाचे मंत्रिपद गमवावे लागले होते. शासकीय लाभाच्या प्रकरणात कृषिमंत्रीपद कोकाटे यांना सोडावे लागले होते. त्यात झिरवळ यांचा राजीनामा घेतल्यास पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला आहे.
झिरवळांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पुढे आणले-फडणवीस
व्हिडिओ समोर आल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरुन संपर्क केलाय. तीन-ते चार व्हिडिओ जोडून ते चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहेत. यासंदर्भात झिरवळ यांना तक्रार करण्यास सांगितले आहे. त्यानंतर व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. आम्ही आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासंदर्भात कारवाई करू, मात्र सत्यता पडताळली जाईल. झिरवाळ यांचे व्हीडिओ गंभीर, सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटलंय.