नाशिक पदवीधर निवडणूक गुंता live : सत्यजीत तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार

  • Written By: Published:
Satyajeet Tambe, Sudhir Tambe, Balasaheb Thorat

अधिकृत उमेदवारी देऊनही अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबेंवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई
होण्याची शक्यता

सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणारः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

मी अद्याप भाजपच्या नेत्यांशी बोललो नाही, आता भाजप नेत्यांना भेटणारः सत्यजीत तांबे

सत्यजीत तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार, एबी फॉर्म मात्र नाही

सत्यजीत तांबे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, दोन अर्ज दाखल

भाजपचा एबी फाॅर्म घेऊन रवी अनासपुरे आणि इतर पदाधिकारी नाशिकच्या निवडणूक कार्यालयात दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी बाकी.

सुधीर की सत्यजीत काॅंग्रेसचा उमेदवार असणार, याचा निर्णय तांबे कुटुंबावर सोपविण्यात आला होता, असे काॅंग्रेसच्या नेत्याचा दावा

बाळासाहेब थोरात हे सुधीर तांबे यांच्यासोबत अर्ज दाखल करताना अनुपस्थित. थोरात हे वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत

सुधीर तांबे यांचा काॅंग्रेसकडून अर्ज दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यजीत तांबे यांचे नाव भाजपने केंद्रीय समितीकडे पाठविल्याची चर्चा सुरू आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी बाकी; भाजपकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही…

तांबे कुटुंबाकडून होकार नसल्याने भाजपची डोकेदुखी वाढली, भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात

अहमदनगरमधील विखेंचे कार्यकर्ते माजी नगरसेवक धनंजय जाधव नाशिकमध्ये दाखल, भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चिन्हे, अद्याप एबी फॉर्म नाही

Dhanjay Jadhav

Dhanjay Jadhav

सत्यजीत तांबे यांना भाजपने उमेदवारी दिली तर स्वागतः राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याने खळबळ
सत्यजीत तांबे हे धोका पत्करणार का? त्यांच्या ट्विटचे अनेक अर्थ

काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर, दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Jan 2023 01:23 PM (IST)

    नाशिक पदवीधर निवडणूकः live

    काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर, आज दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार

Tags

follow us