NCP : पवारांनी अजितदादांचे पंख कापले? संजय राऊत म्हणतात…
Sanjay Raut On Ajit Pawar : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावरुन भाजप नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना या निवडीबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)म्हणाले की, राष्ट्रवादी आणि मुळात इतर पक्षाच्या अंतर्गत घडामोडीबद्दल दुसरं कोणी बोलू नये. त्याचवेळी शरद पवार यांनी अजितदादांचे (Ajit Pawar)पंख कापले का असा सवाल करण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, अजितदादा त्यांच्या पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अशी दोन पदं आहेत आणि ही दोन्ही पदं फार महत्वाची असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. (ncp-executive-chairman-sanjay-raut-on-ajit-pawar)
अजित पवार पुन्हा नाराज? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
संजय राऊत म्हणाले, आज राष्ट्रवादीचा वर्धापण दिन आहे. आज त्यांच्या पक्षाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. 25 वर्षापूर्वी या पक्षाची स्थापना झाली. मुंबईत शिवतिर्थावर, तेव्हा शिवाजीपार्कच्या एका टोकावरील जिमखान्यावरुन आम्ही हा सोहळा पाहात होतो. कारण ती एक ऐतिहासिक घटना होती. प्रचंड गर्दी उसळली होती.
अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर
त्यावेळी शरद पवार होते, तारिख अन्वर होते, सोहळा अजूनही मला आठवतोय. आम्ही होतो, उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे होते असे बरेच लोकं होती, आम्ही पाहात होतो, एक घडामोड घडतेय राजकीय, त्या पक्षाला आज 25 वर्ष पूर्ण झाली. आज 25 वर्षानंतर त्या पक्षात नवीन घडामोडी घडत असतील तर त्यावर आम्ही का बोलावं? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
खासदार राऊत म्हणाले, शरद पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या नविन नियुक्त्या केल्या आहेत, नविन जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आणि त्या पक्षाच्या रौप्यमहोत्सव साजरा होतोय, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. त्याचवेळी पत्रकारांनी अजित पवार यांना डावलल्यामुळे ते नाराज आहेत असं म्हटलं आहे.
अजित पवारांवर अन्याय झाल्याची कुजबूज सुरु झाली आहे, त्यावरुन संजय राऊत म्हणाले की, ज्या कोणावर न्याय अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती बोलेल बाहेरच्यांनी त्यावर का बोलावे? त्यांनी त्यांचं वकिलपत्र भाजपला दिलंय का? आम्हाला दिलंय का? तर नाही, त्याला ते समर्थ आहेत, शरद पवार समर्थ आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.