‘एकनाथ शिंदे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री’; जाहिरातवादावर आव्हाडांचा घणाघात

‘एकनाथ शिंदे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री’; जाहिरातवादावर आव्हाडांचा घणाघात

Jitendra Awhad : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून काल वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदेंवर जहरी टीका केली.

राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री आहेत ते. ठाण्यात आम्ही बघितलेले आहे सगळे. त्यामुळे कालची जाहिरात होणरच होती. मी किती मोठा आहे हे दाखविणे त्यांचे नेहमीचेच काम आहे, असेही आव्हाड म्हणाले.

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

आव्हाड यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जाहिरात वादावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज त्यांना कळलं असेल या माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा आहेत हे आजच्या जाहिरातीतून स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या नकाशावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न झाला. पण, ते होणार नाही, म्हणजे खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं. माणसाच्या स्वभावाचा आणि चारित्र्याचा भाग आहे.

ते पुढे म्हणाले, सामान्य माणसाच्या घरात जा आणि ते काय म्हणतात ते बघा. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी, राहुल गांधी हे सगळे मिळून एकत्र लढले तर दोनशे जागांच्या खाली येतच नाहीत. शिंदे साहेबांना बरोबर घेऊन भाजपने स्वतःच मोठं नुकसान केलं. ज्या माणसानं तुम्हाला बोटाला धरून त्या पदावर बसवलं त्याची इतकी अवहेलना करणं तुम्हाला शोभत नाही. त्यांनी कायम या लोकांना सांभाळून घेतलं. कितीही नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस त्यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत, असे आव्हाड म्हणाले.

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

काँग्रेसला जर सर्व्हेत 21 जागा मिळणार असतील तर आम्ही 40 च्या वर जाणार. मी महाविकास आघाडीचा सर्व्हे सांगतो. सगळ्या मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पवार साहेबांना प्रत्येक मतदारसंघाची माहिती आहे, असे आव्हाड म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube